Surabhi Jayashree Jagdish
आपल्यापैकी अनेकजण जीन्सचा वापर करतात.
मात्र तुम्ही कधी जीन्सला असलेला छोटा खिसा पाहिलाय का?
तुमच्या मनात कधी विचार आलाय का की, हा खिसा का असतो? आणि त्याचा वापर काय असतो?
जीन्सच्या या खिशाला वॉच पॉकेट किंवा फोब पॉकेट म्हटलं जातं.
याचा वापर घड्याळं किंवा इतर छोट्या वस्तू ठेवण्यासाठी होतो. 19 व्या शतकामध्ये हा छोटा खिसा जीन्समध्ये आवतरला.
त्यावेळी पुरुष खिशातून घड्याळ घेऊन जायचे. घड्याळ सुरक्षित राहावं म्हणून हा वेगळा छोटा खिसा तयार करण्याची कल्पना आली.
दीडशे वर्षापूर्वी रूढ झालेली ही छोट्या खिशाची परंपरा अजूनही सुरू आहे