विमान पायलट लांब दाढी का ठेवू शकत नाहीत?

Surabhi Jayashree Jagdish

दाढी

विमान कंपन्यांचे काही विशिष्ट नियम आहेत जे प्रत्येक क्रू मेंबरने पाळावे लागतात. यामध्ये पायलटच्या दाढीबाबतही विमान कंपन्यांचे नियम आहेत.

लांब दाढी

कोणताही वैमानिक लांब दाढी ठेवू शकत नाही. अनेकांना यामागील कारण माहिती नसावीत.

क्लीन शेव्ह

तुम्ही चित्रपटांमध्ये वैमानिकांना क्लीन शेव्ह किंवा खूप लहान दाढी ठेवून विमान उडवताना पाहिलं असेल. परंतु वास्तविक जीवनात वैमानिकांना क्लीन शेव्ह राहावं लागतं.

काय कारण

तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण विमानाच्या वैमानिकाची दाढी प्रवाशांच्या सुरक्षिततेशी जोडलेली असते.

ऑक्सिजनची पातळी

विमान जसजसे उंच चढते तसतसे ऑक्सिजनची पातळी कमी होते. कधीकधी केबिनमधील हवेचा दाब कमी होतो आणि मास्कचा वापर करावा लागतो.

मास्क

जर पायलटच्या चेहऱ्यावर दाढी असेल तर मास्क घालणं कठीण होईल, मास्क चेहऱ्यावर व्यवस्थित बसणार नाही.

प्रवाशांची सुरक्षितता

जर ऑक्सिजन मास्क पायलटच्या चेहऱ्यावर व्यवस्थित बसला नाही तर तो अस्वस्थ होईल आणि प्रवाशांची सुरक्षितता देखील धोक्यात येईल.

विवाहित महिला गुगलवर काय सर्वाधिक सर्च करतात, पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Women Search the Most on Google | saam tv
येथे क्लिक करा