Dhanshri Shintre
गरम मसाला खरोखर गरम आहे का? किंवा त्याच्या नावामागे वैज्ञानिक व आयुर्वेदिक कारणे आहेत? चला, या प्रश्नाचे उत्तर शोधूया.
गरम मसाला दालचिनी, वेलची, लवंगा, काळी मिरी, जिरे, धणे, तमालपत्र, जायफळ यांसारख्या अनेक मसाल्यांचे मिश्रण असतो.
ही मसाले भाजून कुस्करले जातात, ज्यामुळे त्यांची चव आणि सुगंध वाढतो. भारतीय जेवणात चव वाढवून आरोग्याला फायदेशीर असतो.
गरम मसाल्यातील 'गरम' म्हणजे उष्णता, तिखटपणा नाही. आयुर्वेदानुसार, हे मसाले शरीरातील उष्णता वाढवतात आणि आरोग्यास उपयुक्त ठरतात.
ही उष्णता शरीरातील पचनशक्ती सक्रिय करते आणि चयापचय वाढवते, म्हणून या मसाल्याला 'गरम मसाला' असे म्हणतात.
आयुर्वेदानुसार, पचनशक्ती महत्त्वाची असते; कमी पडल्यास अन्न पचत नाही आणि त्यामुळे शरीरात विविध आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.
गरम मसाल्यातील काळी मिरी, लवंग, दालचिनी, वेलची पचन सुधारतात, कफ कमी करतात आणि शरीरात उष्णता वाढवून चयापचय वेगवान करतात.
गरम मसाला पचन सुधारतो, गॅस आणि अपचनाच्या त्रासापासून आराम देतो आणि पचनसंस्थेला निरोगी ठेवण्यास मदत करतो.
गरम मसाला शरीरातील उष्णता वाढवून कॅलरीज जाळण्यास मदत करतो आणि वजन नियंत्रणात ठेवतो.
अँटिऑक्सिडंट्सयुक्त मसाले शरीरातील संसर्गाचा मुकाबला करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
गरम मसाला रक्तातील साखर व कोलेस्टेरॉलची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतो.