Dhanshri Shintre
अनेकजण घरातील देवघरात पडदा लावतात, पण यामागचं खरं कारण तुम्हाला माहिती आहे का?
रात्रीच्या वेळी मंदिरात देवतांच्या मूर्ती कपड्यांनी झाकल्या जातात, यामागे धार्मिक कारण असते.
रात्र ही देवतांच्या विश्रांतीची वेळ मानली जाते, म्हणून त्या वेळी मूर्ती झाकल्या जातात.
देव झोपलेले असतात, म्हणून मूर्ती झाकल्या जातात, जेणेकरून त्यांची विश्रांती शांततेत पार पडावी.
सकाळी स्नान केल्यानंतरच पूजास्थळावरील पडदा हटवावा, कारण तोपर्यंत देवाची विश्रांती पूर्ण होते.
देवघरातील पडद्यांसाठी पिवळा रंग अत्यंत मंगल आणि शुभ मानला जातो, त्यामुळे तो अधिक वापरला जातो.
देवघरात पिवळ्या पडद्यांचा उपयोग केल्याने घरातील सदस्यांमध्ये श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मकता वाढण्यास मदत होते.
देवघरासाठी गुलाबी किंवा क्रीम रंगाचे पडदेही योग्य मानले जातात, कारण ते शांतता आणि सौम्यता दर्शवतात.