Shraddha Thik
हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यात किंवा पूजेमध्ये नारळ फोडण्याचे विशेष महत्त्व आहे. असे करणे अत्यंत शुभ मानले जाते.
जवळजवळ प्रत्येक धार्मिक कार्यात नारळाचा वापर केला जातो. हे सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
नारळाचे पाणी देखील अतिशय पवित्र आणि शुद्ध मानले जाते. असे म्हणतात की हे पाणी घरातील नकाटात्मक ऊर्जा काढून टाकते.
देवांना नारळ अर्पण करणे फार आवडते. त्यामुळेच पूजेत नारळ वापरला जातो आणि तो प्रसाद म्हणून वाटला जातो.
अशी मान्यता आहे की, कोणत्याही शुभ कार्यात नारळ फोडला तर प्रत्येक काम विना अडथळा पूर्ण होते.
पूजेच्या वेळी नारळ फोडल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. तसेच घरामध्ये सुख-समृद्धी टिकून राहते.
असे म्हटले जाते की, नारळ व्यक्तीच्या बाह्य आणि आंतरिक मनाचे प्रतिनिधित्व करतो. अशा स्थितीत जेव्हा आपण देवासमोर नारळ फोडतो, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की ती व्यक्ती आपला अहंकार नष्ट करत आहे.
देवाला प्रसन्न करण्यासाठी नारळ फोडला जातो असे मानले जाते. त्याचा अर्थ असा होतो की, माणूस स्वतःचा अहंकार नारळ फोडून भगवंताच्या चरणी झोकून देतो.