Manasvi Choudhary
उद्या म्हणजेच 19 ऑक्टोबरला सर्वत्र दसरा हा सण साजरा होणार आहे.
दसऱ्याला आपट्याची पाने वाटण्याचा परंपरा फार जुनी आहे. परंतु दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याचीच पाने का वापरतात? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळी 'कौत्स' नावाचे एक महान ऋषी होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य विद्यार्जनासाठी आणि गुरुसेवेसाठी समर्पित केले होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी गुरुदक्षिणा देण्याचा आग्रह धरला. गुरूंनी त्यांच्याकडून १४ कोटी मुद्रा मागितल्या.
गरीब आणि ऋषीधर्म पाळणारे कौत्स ऋषी मदतीसाठी अयोध्येचे प्रतापी राजा रघु यांच्याकडे गेले. राजा रघु यांनी त्या काळी सर्व संपत्ती दान केली होती, त्यामुळे त्यांच्याकडेही तेवढे धन नव्हते.
कुबेराने अयोध्येतील 'आपटणा' आणि 'शमी' झाडांवर सोन्याच्या मुद्रेचा वर्षाव केला. राजा रघु यांनी ती सर्व संपत्ती कौत्स ऋषींना घेण्यास सांगितली. परंतु, कौत्स ऋषींनी केवळ त्यांच्या गुरुदक्षिणेपुरतीच संपत्ती घेतली आणि उरलेले सोने प्रजेसाठी तसेच झाडांवर तसेच सोडले.
प्रजेने ते सोने लुटले आणि आनंदाने उत्सव साजरा केला. तेव्हापासूनच दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने 'सोनं' म्हणून लुटण्याची आणि एकमेकांना वाटण्याची प्रथा सुरू झाली