Surabhi Jayashree Jagdish
प्रत्येक देशाचा एक राष्ट्रीय प्राणी असतो. हा प्राणी देशाची संस्कृती आणि ओळख प्रतिबिंबित करतो.
भारताचा राष्ट्रीय प्राणी सध्या वाघ आहे.
१८ नोव्हेंबर १९७२ रोजी वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात आलं होतं.
तुम्हाला माहितीये का वाघाला राष्ट्रीय प्राणी म्हणून निवडण्याचं कारण म्हणजे चपळता, ताकद आणि दृढनिश्चय आहे.
१९६९ मध्ये वन्यजीव मंडळाने सिंहाला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केलं होतं.
वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी भारतातील वन्यजीव विविधतेचे प्रतीक आहेत.
व्याघ्र संवर्धन ही पंतप्रधानांच्या प्रमुख योजनांपैकी एक असून त्यासाठी 'व्याघ्र प्रकल्प' सारखे अनेक प्रकल्प राबवले जातात.