ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रारंभी भारतातील सर्व दिवे गॅसवर चालणारे होते आणि वीजेचा वापर नंतर सुरू झाला.
स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबईत पहिला विजेचा दिवा इंग्रजांच्या हस्ते पेटवण्यात आला होता.
तरीही, त्या विजेच्या दिव्याला कायम प्रकाशित ठेवण्याची जबाबदारी एका भारतीय उद्योजकाने निभावली होती.
१८८३ मध्ये इंग्रजांनी मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये पहिल्यांदाच विजेचा दिवा प्रज्वलित केला होता.
त्या काळात पालिकेने विजेच्या दिव्यांची जबाबदारी एका खासगी कंपनीकडे सोपवली होती.
मात्र एका वर्षातच ती कंपनी बंद झाली आणि नंतर पालिकेने टाटांच्या साहाय्याने मुंबईत विजेचे दिवे बसवले.
विजेच्या दिव्यांची वाढती गरज लक्षात घेऊन पुढे टाटा पॉवर हाऊसची स्थापना करण्यात आली.
मुंबईत पहिला दिवा इंग्रजांनी लावला, परंतु दिवा कायम राहावा यासाठी प्रकाश देण्याचं महत्त्वाचं काम जमशेदजी टाटा यांनी केलं.