Chetan Bodke
बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक अरबाज खानच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु आहे.
अरबाजने आणि त्याची गर्लफ्रेंड शूरा खानने कोणताही गाजावाजा न करता, साध्या पद्धतीने गुपचूप सोमवारी (२४ डिसेंबर) निकाह केला.
अरबाज खानची बहीण अर्पिता खानच्या घरी निकाह झाला असून दोघांच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळचा मित्र परिवार उपस्थित होता.
लग्नासाठी शुराने सुंदर लेहेंगा तर अरबाजने फ्लोरल प्रिंट जोधपुरी शेरवानीसारखा ड्रेस परिधान केला होता.
सध्या सोशल मीडियावर अरबाज खानची बायको नेमकी कोण आहे?, याची प्रचंड चर्चा सुरु आहे.
अरबाज खान आणि शूरा खानची भेट 'पटना शुक्ला'च्या सेटवर भेट झाली होती. हा चित्रपट येत्या २०२४ ला रिलीज होणार आहे.
एका इंग्रजी पोर्टलच्या बातमीनुसार, शूरा खानचा जन्म ५ जुलै १९८२ ला झाला असून ती ४१ वर्षांची आहे.
लंडनमध्ये तिचा जन्म झाला असून युएईमधून तिने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.
शूराने आपल्या आईकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेतले असून वयाच्या १६व्या वर्षापासून ती अभिनयामध्ये सक्रिय झाली.
२०१३ मध्ये अर्जुन कपूरच्या 'औरंगजेब' या चित्रपटातून शूराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.