Manasvi Choudhary
सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे ती म्हणजे अभिनेत्री वेरा बेदी हीची.
नुकत्याच झालेल्या ‘द बैड्स ऑफ बॉलीवुड’ या वेब सिरिजच्या प्रीमियर इवेंटमध्ये वेरा सहभागी होती.
ब्लॅक आऊटफिट आणि हलकासा मेकअप मध्ये वेरा कमालीची सुदंर दिसत आहे.
सोशल मीडियावर वेरा बेदीचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. वेरा बेदी तिच्या मनमोहक सौंदर्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
आघाडीच्या अभिनेत्री करिना कपूर आणि ऐश्वर्या राय यांच्याशी तिची तुलना केली जात आहे.
वेरा बेदी ही अभिनेते रजत बेदी आणि मोनालिसा बेदी यांची मुलगी आहे.
वेरा बेदीचा जन्म १२ फेब्रुवारी २००७ मध्ये झाला आहे. सध्या तीचे वय १८ वर्ष आहे.
वेरा बेदी सध्याशिक्षणात व्यस्त असून ती आगामी काळात बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल का याकडे लक्ष लागले आहे.