Ankush Dhavre
शुक्रवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध युपी वॉरियर्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला.
या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने विजय मिळवत विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
मात्र या सामन्यात चर्चेत राहिली ती विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासातील पहिली हॅट्रिक घेणारी २० वर्षीय युवा गोलंदाज इस्सी वाँग
इस्सी वाँग ही मध्यमगती वेगवान गोलंदाज गोलंदाज आहे.
मैदानावर गोलंदाजी करताना ती फलंदाजांच्या दांड्या गुल करत असते. तसेच ती आपल्या हटके लूकमुळेही चर्चेत असते.
इस्सी वाँग ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व करते.
तिचा जन्म १५ मे २००२ रोजी इंग्लंडमध्ये झाला होता.
ती आपल्या गोलंदाजीसह आता बॉयकट लूकमुळेही चर्चेत आली आहे.
इंस्टाग्रामवर ५६ हजार फॉलोवर्स असलेली इस्सी वाँग सोशल मीडियावर आपल्या दैनंदिन आयुष्यतील फोटो शेअर करत असते.