Shruti Vilas Kadam
सफेद तीळ ‘उष्ण’ प्रवृत्तीचे असल्यामुळे थंडीच्या दिवसांत शरीर आतून गरम ठेवण्यास मदत करतात. थंडीमुळे येणारी कापरे आणि गारवा कमी होतो.
सफेद तीळात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे हाडांची मजबुती वाढते आणि सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.
तीळात असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि झिंक शरीराची इम्युनिटी मजबूत करतात. हिवाळ्यात सर्दी-खोकल्यापासून संरक्षण मिळते.
दररोज सकाळी एक चमचा सफेद तीळ खाल्ल्याने बद्धकोष्ठता कमी होते आणि पचनक्रिया सुरळीत राहते. पोट साफ राहण्यास मदत होते.
तीळातील नैसर्गिक तेल त्वचेला आतून पोषण देते. थंडीत होणारी त्वचेची कोरडेपणा आणि फाटणे कमी होते, त्वचा मऊ राहते.
सफेद तीळ केसांच्या मुळांना बळकटी देतात. केस गळणे कमी होते आणि केसांना नैसर्गिक चमक येण्यास मदत होते.
तीळात प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स भरपूर असल्यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते. थंडीत येणारा अशक्तपणा दूर होतो.