कोमल दामुद्रे
अंगावरुन पांढरे जाणे किंवा व्हाईट डिस्चार्ज ही बहुतांश महिलांसाठी एक महत्त्वाची समस्या असते.
काही वेळा व्हाईट डिस्चार्ज होणे नॉर्मल असते पण हा डिस्चार्ज जास्त प्रमाणात झाला तर मात्र ते धोक्याचे लक्षण असू शकते.
मासिक पाळीच्या काही दिवस आधी ठराविक प्रमाणात व्हाईट डिस्चार्ज होणे नॉर्मल आहे.
पाळीच्या नंतर किंवा एरवीही जास्त प्रमाणात अशाप्रकारचा व्हाईट डिस्चार्ज होत असेल किंवा त्याचा रंग वेगळा असेल, वास येत असेल तर त्याकडे लक्ष द्यायला हवं.
व्हाईट डिस्चार्जमुळे पाठदुखी, मूड स्विंग्ज, कॅल्शियमची कमतरता अशा तक्रारी निर्माण होतात.
घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. पाहूया हे उपाय कोणते...
पिकलेली केळी खाणे हा व्हाईट डिस्चार्ज कमी करण्यासाठी एक सर्वोत्तम मार्ग आहे. सकाळ-संध्याकाळ साखरेसोबत केळं खाल्ल्यास फायदा होतो
आवळ्याची पेस्ट किंवा पूड घेऊन त्यात मध घालून घेतल्यास फायदा होतो
अंजीर फळ किंवा ड्राय अंजीर खाणे हा व्हाईट डिस्चार्जवरील एक सर्वोत्तम उपाय आहे.
मेथीचे दाणे हा पांढरं जाणं कमी व्हावं यासाठीचा एक उत्तम उपाय आहे.
२ चमचे धणे १ ग्लास पाण्यात घालून चांगले उकळावे. पाणी अर्धे झाल्यावर गॅस बंद करावा आणि सकाळ संध्याकाळ हे पाणी प्यावे.