Dhanshri Shintre
कॅल्शियमशिवाय दातांच्या मजबुतीसाठी जीवनसत्त्वे महत्त्वाची आहेत, त्यात मुख्यतः व्हिटॅमिन D, C आणि A यांचा समावेश होतो.
काही जीवनसत्त्वांची कमतरता झाल्यास दातांचा रंग बदलू शकतो, पिवळसरपणा वाढतो आणि दातांचे आरोग्य कमकुवत होऊ शकते.
शरीरात व्हिटॅमिन सी कमी झाल्यास दातांचा रंग पिवळसर दिसू शकतो आणि त्यांची नैसर्गिक चमक कमी होऊ शकते.
शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास दातांचा रंग बदलू शकतो आणि त्यांची मजबूती कमी होण्याची शक्यता वाढते.
दात स्वच्छ आणि पांढरे राहण्यासाठी केवळ कॅल्शियम नव्हे, तर व्हिटॅमिन A आणि B12 देखील महत्त्वाची भूमिका बजावतात.
तोंडाच्या आरोग्यासाठी कॅल्शियमसह विविध जीवनसत्त्वे आवश्यक आहेत, जी दात आणि हिरड्यांचे आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करतात.
योग्य प्रकारे ब्रश न केल्यास दातांवर मळाचा थर साठतो, ज्यामुळे दातांचा रंग पिवळसर दिसू लागतो आणि चमक कमी होते.
दात निरोगी आणि स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसातून किमान दोन वेळा ब्रश करणे आवश्यक आहे, अन्यथा मळ साचून पिवळसरपणा येतो.