Surabhi Jayashree Jagdish
भाजी बनवताना मीठ-तिखटासोबत किंचित साखर घातली तर काही भाज्यांची चव अधिक रुचकर होते. साखरेमुळे तिखट-आंबट चव मवाळ होते आणि भाजीला एक वेगळा स्वाद येतो.
काही भाज्यांमध्ये साखर जास्त नाही अगदी चिमूटभरच वापरायची असते. खाली अशाच काही भाज्या दिल्या आहेत ज्यामध्ये साखर घातल्याने चव वाढते.
कोबीला थोडीशी साखर घातली तर त्याची कडवट चव कमी होते. तिखट-मीठाची चव अधिक चांगली लागते. यामुळे भाजी कोरडी आणि रुचकर बनते.
दोडक्याला नैसर्गिक चव ही वेगळी असते. यामध्ये चिमूटभर साखर घातल्याने चव अधिक चांगली लागते. यामध्ये फोडणीचा स्वाद चांगला जाणवतो.
कारल्याची कडू चव कमी करण्यासाठी साखर उपयोगी ठरते. तिखट-आंबटासोबत साखर संतुलन साधते. अशावेळी त्याची चवही चांगली बनते.
उसळीमध्ये साखर घातल्याने चव छान लागते. यामुळे भाजी तिखट होत नाही. तसंच उसळ अधिक रुचकर लागते.
भेंडीमध्ये किंचित साखर घातल्याने चिकटपणा जाणवत नाही. भाजीला हलकी गोडसर चव येते. यामध्ये तिखट-मीठ घातल्यास लहान मुलांनाही भाजी आवडते.