कोणत्या भाजीच्या फोडणीमध्ये मिरचीच्या पेस्टचा वापर करू नये?

Surabhi Jayashree Jagdish

मिरचीची पेस्ट

भाजीच्या फोडणीमध्ये मिरचीच्या पेस्टचा वापर अनेक भाज्यांमध्ये केला जातो

चव बिघडते

काही विशिष्ट भाज्यांमध्ये मिरचीची पेस्ट वापरल्यास भाजीची मूळ चव बिघडते किंवा ती अपेक्षित चव देत नाही.

दूधी भोपळ्याची भाजी

दूधी भोपळ्याची भाजी साधारणपणे साधी, सौम्य आणि गोडसर असते. त्यात मिरचीची पेस्ट वापरल्यास भाजी खूप तिखट होऊ शकते आणि तिचा नैसर्गिक गोडसरपणा हरवून जातो.

मेथी, पालक यांसारख्या पालेभाज्या

पालेभाज्यांची चव थोडीशी कडसर असते, आणि मिरची पेस्ट वापरल्यास ती कडू आणखी वाढू शकते.

भेंडीची भाजी

भेंडीची भाजी बनवताना मिरचीची पेस्ट वापरण्याऐवजी हिरवी मिरची उभी चिरून घातल्यास चव चांगली लागते. पेस्टमुळे भाजी चिकट होण्याची शक्यता असते.

सुरण किंवा अळूची भाजी

सुरण किंवा अळूची भाजी करताना मिरचीच्या पेस्टऐवजी तिखट, गूळ, चिंच आणि इतर मसाले वापरले जातात, ज्यामुळे घशातील खवखव कमी होते.

दुधी भोपळ्याची कोशिंबीर

कोशिंबीरमध्ये मिरची पेस्ट वापरल्यास ती चवदार लागत नाही, त्याऐवजी हिरवी मिरची बारीक चिरून घातल्यास चव अधिक चांगली लागते.

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

येथे क्लिक करा