Dhanshri Shintre
मधुमेही रुग्णांनी आहारात काळजी घ्यावी लागते. अशा वेळी कोणता चहा योग्य ठरेल, हे जाणून घ्या.
मधुमेह असताना चहा विचारपूर्वक निवडावा, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि शरीराला आवश्यक पोषणही मिळते.
ग्रीन टी मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर ठरते, कारण ती अँटीऑक्सिडंट्सने भरलेली असून इन्सुलिन संवेदनशीलता वाढवते.
हे रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत करते आणि त्याचबरोबर कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणावरही नियंत्रण मिळवता येते.
काळा चहा देखील मधुमेहात उपयुक्त ठरतो, कारण त्यातील पॉलीफेनॉल साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत करतात.
दालचिनी चहा मधुमेहींसाठी उत्तम मानला जातो, कारण दालचिनी इन्सुलिनचे कार्य अधिक प्रभावीपणे पार पाडण्यास मदत करते.
आल्याचा चहा शरीरातील दाह कमी करतो आणि मधुमेह रुग्णांची साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो.
तुळशी, गिलोय आणि मुलेठीसारखे हर्बल चहा मधुमेहींसाठी उपयुक्त ठरतात, कारण ते नैसर्गिकरित्या आरोग्य सुधारतात.