Sakshi Sunil Jadhav
प्रत्येकालाच आपल्या भविष्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यात लग्नानंतरचं आयुष्य कसं असेल? जोडीदार कसा भेटेल याबद्दल अनेकांना शंका असतात.
सामुद्रिक शास्त्रानुसार, हातावरील काही रेषा आणि चिन्हे व्यक्तीच्या वैवाहिक जीवनाबाबत संकेत देतात. चला तर जाणून घेऊयात.
सामुद्रिक शास्त्रानुसार तळहातावरच्या रेषा आणि चिन्हे व्यक्तीच्या आयुष्याबद्दल आणि जोडीदाराबद्दल माहिती देतात.
काही खास चिन्हे असलेल्या मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि यशस्वी नवरा मिळतो, असं मानलं जातं.
हातावरच्या या विशेष चिन्हांमुळे पती-पत्नीचं नातं मजबूत आणि आनंदी राहण्याची शक्यता असते. त्यामुळे हे चिन्ह महत्वाचं ठरु शकतं.
तळहातावर ध्वज किंवा रथासारखे चिन्ह असेल तर मुलीचं लग्न उच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीसोबत होण्याची शक्यता असते.
तळहातावर स्वस्तिक चिन्ह तयार झाले असेल तर पतीला आर्थिक अडचणी येत नाहीत आणि घरात समृद्धी राहते.
गुलाबी किंवा लालसर तळहात असलेल्या मुलींना लक्ष्मीचे रूप मानल्या जातात आणि त्यांचे आयुष्य सुख-समृद्धीने भरलेलं असतं.
तळहातावर कमळ किंवा मासे चिन्ह असेल तर ते अत्यंत शुभ मानलं जातं आणि हे चांगल्या भविष्याचे संकेत असतात.
उजव्या हातात तराजू आणि डाव्या हातात हत्ती किंवा बैलासारखे चिन्ह असल्यास नवरा मोठा उद्योगपती होण्याची शक्यता असते.
मुलींच्या भाग्यामुळे नवऱ्याच्या करिअर आणि व्यवसायात प्रगती होते, असे शास्त्रात नमूद आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.