GK: पौर्णिमेला उलट्या दिशेने वाहणारी नदी कोणती आहे आणि कुठे आहे?

Dhanshri Shintre

अनोखी नदी

चीनमधील ही अनोखी नदी दर पौर्णिमेला आपला प्रवाह बदलून उलट्या दिशेने वाहते, ज्यामुळे अद्भुत दृश्य तयार होते.

मोजक्या नद्या

जगातील फारच थोड्या नद्यांमध्ये उलट्या प्रवाहाची दुर्मीळ घटना दिसते, त्यापैकी ही नदी विशेषत्वाने ओळखली जाते.

नदीचे नाव

पौर्णिमेला आपला प्रवाह उलट करणाऱ्या या अद्भुत नदीचे नाव कियानतांग असून ती चीनमध्ये प्रसिद्ध आहे.

कशामुळे असे होते?

समुद्रातील भरती-ओहोटीच्या परिणामामुळे नदीत प्रवाहाची दिशा बदलते आणि त्यामुळे ही अनोखी नैसर्गिक घटना घडते.

भरती

कियानतांग नदीतील भरतीदरम्यान लाटा तब्बल 30 फूट उंच झेपावतात, ज्यामुळे नदीचे दृश्य अत्यंत थरारक आणि विस्मयकारक दिसते.

वेग

हे 40 किमी प्रतितास वेगाने सरकते आणि आपल्या अद्भुत लाटांच्या प्रवाहामुळे याला "सिल्व्हर ड्रॅगन" म्हणून संबोधले जाते.

पर्यटक

दरवर्षी हजारो पर्यटक हे दुर्मीळ नैसर्गिक दृश्य अनुभवण्यासाठी येथे गर्दी करतात आणि या थरारक क्षणांचे साक्षीदार बनतात.

NEXT: चप्पलचा शोध कोणी आणि कुठे लावला गेला? वाचा रंजक माहिती

येथे क्लिक करा