ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुम्ही पेट्रोल भरण्यासाठी पंपावर जाता तेव्हा तेथे अनेक प्रकारचे पेट्रोल उपलब्ध असतात. या पेट्रोलच्या किमतीही वेगवेगळ्या असतात.
भारतात साधारणपणे दोन प्रकारचे पेट्रोल उपलब्ध आहे. एक साधं पेट्रोल आणि दुसरे पॉवर पेट्रोल म्हणजे प्रीमियम पेट्रोल.
पॉवर पेट्रोलला प्रीमियम, स्पीड आणि एक्स्ट्रा माईल, हाय स्पीड या नावांनी ओळखले जाते.
पॉवर पेट्रोलमध्ये ऑक्टेनचे प्रमाण जास्त असते. ऑक्टेन इंजिनला पूर्ण क्षमतेने काम करण्यास मदत करते.
साधं पेट्रोलपेक्षा पॉवर पेट्रोल अधिक महाग होण्याचे कारण म्हणजे त्याच्या उत्पादनाचा खर्च जास्त असतो.
तुम्ही नॉर्मल पेट्रोल वापरावे की पॉवर पेट्रोल हे तुमच्या वाहनांच्या प्रकारावर अवलंबून असते.
पॉवर पेट्रोल हे वाहनाच्या इंजिन, स्पीड आणि पॉवरवर कार्य करते. यामुळे इकॉनॉमीमध्ये वाढ होते.