Surabhi Jayashree Jagdish
पांढरा कॉटन ड्रेस हा एलिगन्स आणि फ्रेश लूक देतो. त्यामुळे त्यावर घातलेलं मंगळसूत्र जास्त उठून दिसण्यासाठी कॉन्ट्रास्ट, डिझाइन महत्त्वाची असते. अशावेळी या ड्रेसवर कोणतं मंगळसूत्र उठून दिसतं ते पाहूयात.
पांढऱ्या ड्रेसवर काळे मणी जोरदार कॉन्ट्रास्ट देतात. मधोमध गोल्ड पेंडंट असेल तर लूक उठून दिसतो. डेली वेअर आणि फेस्टिव्ह दोन्हीसाठी योग्य पर्याय आहे.
टेंपल स्टाईल पेंडंट पांढऱ्या ड्रेसवर रॉयल लूक देतो. कॉटन ड्रेसच्या साधेपणाला हे डिझाइन छान लूक देतं. पारंपरिक कार्यक्रमासाठी खूप छान दिसतं.
सिंपल पांढऱ्या ड्रेसवर डायमंड पेंडंट देतो. जास्त जड न वाटता एलिगंट लूक तयार होतो.
ऑफिस किंवा कॅज्युअल आउटिंगसाठी योग्य आहे.
लांब मंगळसूत्र पांढऱ्या ड्रेसवर उठून दिसतं. प्लेन ड्रेसला परफेक्ट लूक मिळतो. हाय नेक किंवा बंद गळ्याच्या ड्रेसवर सुंदर दिसते.
रोज गोल्ड टोन पांढऱ्यावर मऊ पण उठावदार दिसतो. यामुळे मॉडर्न आणि स्टायलिश फील येतो. तरुण मुलींसाठी हा उत्तम पर्याय आहे.
पांढऱ्या ड्रेससोबत मोती खूप क्लासी दिसतात. गोल्ड + पर्ल कॉम्बिनेशन सॉफ्ट एलिगन्स लूक देतं. ऑफिसमध्येही हे परफेक्ट वाटतं.