Dhanshri Shintre
स्पीड ट्रेनबद्दल सर्वांनाच माहिती आहे, पण तुम्हाला ठाऊक आहे का भारतातील सर्वात धीम्या गतीची ट्रेन कोणती आहे? चला जाणून घेऊया.
भारताची सर्वात धीमी मानली जाणारी मेट्टुपलयम–ऊटी निलगिरी पॅसेंजर ट्रेन पर्यटकांची विशेष पसंती आहे. ऊटी आणि कुन्नूर पाहण्यासाठी प्रवासी या अनोख्या रेल्वेची निवड करतात.
ही टॉय ट्रेन तामिळनाडूमधील मेट्टुपलयम ते ऊटी असा प्रवास करते. ४६ किमी अंतर पार करण्यासाठी तिला तब्बल पाच तासांचा कालावधी लागतो.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या ट्रेनचा सरासरी वेग फक्त ताशी १० ते १२ किमी आहे. चला जाणून घेऊया तिचा प्रवास इतका धीमा का असतो.
ही ट्रेन डोंगराळ मार्गावर धावते आणि खडतर चढ-उतार पार करण्यासाठी विशेष रॅक अँड पिनियन प्रणालीचा वापर करते.
ट्रॅकवर अनेक तीव्र वळणं आणि उतार असल्यामुळे प्रवास सुरक्षित ठेवण्यासाठी या ट्रेनचा वेग अत्यंत कमी राखला जातो.
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात समाविष्ट ही ट्रेन रम्य मार्गावरून धावते आणि प्रवासादरम्यान अप्रतिम निसर्गसौंदर्य अनुभवायला मिळते.
१८५४ मध्ये हा रेल्वेमार्ग सुचवला गेला, मात्र कठीण डोंगराळ भूप्रदेश आणि उंचसखल मार्गांमुळे त्याच्या बांधकामात मोठे अडथळे आले.
यामुळे या रेल्वेमार्गाचे बांधकाम १८९१ मध्ये सुरू झाले आणि अनेक आव्हानांवर मात करून ते अखेर १९०८ मध्ये पूर्ण झाले.
या मार्गावर २०८ वळणे, १६ बोगदे आणि २५० पेक्षा जास्त पूल असून प्रत्येकामुळे ट्रेनचा वेग कमी ठेवावा लागतो.