नेपाळचा राष्ट्रीय प्राणी कोणता? नाव ऐकून तुम्हालाही होईल आनंद

Surabhi Jagdish

भारत आणि नेपाळमध्ये सुमारे 1,751 किलोमीटर लांबीची सीमा आहे. शिवाय या देशाशी आपले संबंधही खूप घट्ट आहेत.

भारताने आपल्या शेजारी देशांशी चांगले संबंध ठेवले आहेत आणि नेपाळला प्रत्येक कठीण प्रसंगी साथ दिलीये.

नेपाळचे लोकही नोकरीनिमित्त भारतात खूप येतात. शिवाय भारतीय लोकं त्या ठिकाणी फिरायला जातात.

नेपाळमध्ये अनेक हिंदी लोक राहतात आणि त्याठिकाणी बरीच मोठी मंदिरं आहेत.

अशा परिस्थितीत नेपाळचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

नेपाळच्या राष्ट्रीय प्राण्याचे नाव ऐकून सर्व भारतीयांना नक्कीच आनंद होईल.

नेपाळचा राष्ट्रीय प्राणी हिंदू धर्मात पूजनीय आहे आणि मान्यतेनुसार, या प्राण्याच्या शरीरात 33 कोटी देवी-देवता वास करतात.

नेपाळचा राष्ट्रीय प्राणी गाय असून तिला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं