Sakshi Sunil Jadhav
तुम्ही अंडी रोजच्या आहारात घेतच असाल. पण काही पदार्थ अंड्यांसोबत खाल्याने तुम्हाला काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
अंड्यांसोबत विशेषत:खरबूज खाणे टाळावे, कारण काही लोकांना पचनाचा त्रास होऊ शकतो.
अंडी आणि दूध एकत्र घेतल्याने काही व्यक्तींना जडपणा किंवा पोटफुगी जाणवू शकतो.
अंड्यांसोबत दही खाल्ल्याने पचन नीट होत नाही. मग दिवसभर अस्वस्थता जाणवते.
अंडी आणि चीज हे दोन्ही प्रथिने आणि फॅटी पदार्थ असल्याने एकत्र खाल्लाने काहींना पचनास जड जाऊ शकतं.
अंडी आणि मांस एकाच वेळी मोठ्या प्रमाणात खाल्ल्याने पचनसंस्थेवर जास्त भार पडू शकतो.
अंडी आणि मासे एकत्र खाणं टाळायचं असतं. अशी पारंपारिक धारणा आहे. मात्र यामुळे प्रत्येक व्यक्तीला त्रास होतोच असं नाही.
अंड्यांसोबत खिचडी खाणे काही लोकांसाठी जड ठरू शकते, त्यामुळे प्रमाणाकडे लक्ष द्यावे.
अंड्यांसोबत कोणता पदार्थ घ्यावा किंवा टाळावा हे व्यक्तीच्या पचनशक्तीवर अवलंबून असते. वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.