Sakshi Sunil Jadhav
सध्या कॅन्सरच्या समस्या झपाट्याने वाढत चालल्या आहेत. त्यामुळे तरुणांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनीच याची काळजी घेतली पाहिजे.
जंक फूडमुळे कॅन्सरच्या समस्या वाढतात. चवीला चांगले असणारे पदार्थ शरीरासाठी घातक असतात. ते कसं? हे आपण पुढील माहितीत जाणून घेणार आहोत.
कोल्ड ड्रिंकमध्ये साखरेचे प्रमाण सगळ्यात जास्त असते. यामुळे तुमचा कॅन्सरचा धोका वाढू शकतो. कारण त्यामध्ये आर्टीफिशियल केरामेल कलर असतो. त्याने एक केमिकल ४ MEI तयार होतो. हे अमोनिया प्रक्रियेतून तयार होतात.
ग्रिल्ड रेड मीट स्वादिष्ठ असले तरी शरीरासाठी धोक्याचं असू शकतं. कारण तज्ज्ञांच्या मते हाय फ्लेमवर शिजवलेले अन्न खाल्याने कॅन्सर वाढवणारे हायड्रोकार्बन तयार होते.
डीओसेटेलमुळे मायक्रोवेवमधील पॉपकॉर्न चविष्ठ बनतात. मात्र हे गरम केल्याने विषारी बनवतात. कारण त्याच्या बॅगेवरील अस्तर हे कॅन्सरचे असू शकते. त्यामुळे तुम्ही पॉपकॉर्न एअर पॉपरवर भाजू शकता.
जे पदार्थ तुम्हाला कॅनमध्ये मिळतात. त्यात टोमॅटो, कांदा असेल तर त्याने तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो. कारण कॅनवर BPA नावाचं केमिकल शिंपडलं जातं. याने हार्मानल बदल होतात. मेंदूवर परिणाम होतो.
वेजिटेबल ऑईल हे केमिकल यूक्त असतं. त्यामध्ये ओमेगा ६ फॅट्स असतात. त्यामुळे पेशींच्या रचना बदलतात आणि कॅन्सरला आपण बळी पडू शकतो.
फार्मड फिश सॅल्मनमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात. अमेरिकेत खाल्या जाणाऱ्या साठ टक्के सॅल्मन शेतात खालेल्या किटकनाशकांपासून वाढत असतो. त्यामुळे आपण हा मासा खाल्यावर कॅन्सरच्या समस्येला सामोरं जावे लागू शकते.