ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
केस गळणे हे एखाद्या व्यक्तीच्या आहार, लाईफस्टाइल, आणि दैनंदिन दिनचर्येवर अवलंबून असते. याशिवाय अनेकवेळा अनुवांशिक समस्यामुळे देखील हे होऊ शकते.
दूषित पाणी, आजार आणि काही औषधांचे सेवन यामुळेही केस गळण्याची समस्या उद्भवते. परंतु, तुम्हाला माहित आहे का कोणते ५ पदार्थ खाल्ल्याने केस गळण्याची समस्या वाढते, जाणून घ्या.
चिप्स, पिझ्झा, बर्गर यांसारख्या जंक फूड आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थामध्ये ट्रान्स फॅट असते, ज्यामुळे केस गळतात.
जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढते, जे केसांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.
पास्ता, ब्रेड इत्यादी रिफाइंड कार्बोहायड्रेट्समुळेही केस गळतात.
काही दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने शरीरात सेबम वाढू शकतो, जे केसांसाठी हानिकारक आहे.
व्हिटॅमिन ए शरीरासाठी फायदेशीर असले तरी, त्याचे जास्त सेवन केसांना नुकसान पोहोचवू शकते.