Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रात, झोपण्याची योग्य दिशा याविषयी सांगितले आहे. झोपताना तुम्ही डोके कोणत्या दिशेला ठेवून झोपता हे देखील महत्वाचे आहे.
वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण दिशेला डोके करून झोपणे शुभ मानले जाते. आरोग्यानुसार ही दिशा अत्यंत महत्वाची मानली जाते.
पूर्व दिशेला डोकं ठेवून झोपणे हे देखील शुभ मानले जाते. पूर्व दिशेला डोके ठेवून झोपल्याने एकाग्रता वाढते आणि बुद्धी तल्लख होते.
उत्तर दिशेला डोके करून कधीही झोपू नये. झोप नीट लागत नाही, सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो
पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवाकडे वाहत असते. जेव्हा आपण दक्षिण दिशेला डोके करून झोपतो, तेव्हा आपल्या शरीराचे चुंबकीय क्षेत्र पृथ्वीच्या क्षेत्राशी जुळते. यामुळे मनाला शांती मिळते, रक्ताभिसरण सुधारते आणि गाढ झोप लागते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.