Petticoat color for light sarees: लाईट कलरच्या साड्यांवर कोणत्या रंगाचा पेटीकोट वापरला पाहिजे?

Surabhi Jayashree Jagdish

लाईट रंगाची साडी

लाईट रंगाची साडी नेसताना पेटीकोटचा रंग योग्य नसेल तर साडीचा लुक पूर्णपणे बिघडू शकतो. हलक्या रंगांच्या साड्या पारदर्शक किंवा पातळ असल्यामुळे चुकीचा पेटीकोट आतून उठून दिसतो.

पेटीकोटचा रंग

पेटीकोट योग्य नसेल तर लूक पुर्णपणे बिघडतो. अशावेळी साडी नीट बसत नाही, रंग फिका दिसतो किंवा प्लीट्स नीट उठून दिसत नाहीत. योग्य रंगाचा पेटीकोट निवडला तर साडीचा लुक अधिक एलिगंट आणि ग्रेसफुल दिसतो.

ऑफ-व्हाईट साडी

ऑफ-व्हाईट, पांढऱ्या छटेच्या साड्यांसाठी क्रीम रंग उत्तम लागतो. खूप पांढरा पेटीकोट टाळावा. कारण तो वेगळा उठून दिसतो.

पेस्टल रंगांच्या साड्या

बेबी पिंक, मिंट ग्रीन, स्काय ब्ल्यू साड्यांसाठी स्किन टोन योग्य ठरतो. तो आतून दिसत नाही आणि साडीचा मूळ रंग उठून दिसतो. हा रंग लाईट साड्यांसाठी सेफ ऑप्शन मानला जातो.

हलकी गुलाबी साडी

हलका गुलाबी पेटीकोट साडीशी सहज ब्लेंड होतो. डार्क पिंक किंवा मरून पेटीकोट टाळावा. न्यूड रंग साडीला स्लीक लुक देतो.

हलकी पिवळी साडी

क्रीम रंग पिवळ्या साडीवर फारच सुंदर दिसतो. खूप गडद पिवळा पेटीकोट वापरू नये. लाइट शेड साडीची नाजूकता टिकवतो.

लाईट ब्ल्यू किंवा सी-ग्रीन साडी

या रंगांसाठी स्किन टोन सर्वात सुरक्षित पर्याय आहे. ऑफ-व्हाईट फार ब्राइट नसावा. डार्क रंग टाळल्यास साडी अधिक एलिगंट दिसते.

लाईट ग्रे साडी

सिल्व्हर ग्रे पेटीकोट साडीला रॉयल टच देतो. ब्लॅक पेटीकोट टाळावा, कारण तो जास्त कॉन्ट्रास्ट देतो. स्किन टोन सुद्धा चांगला पर्याय आहे.

कोणत्या भाजीमध्ये खोबरं वापरू नये? भाजीची चव बिघडेल

येथे क्लिक करा