Sakshi Sunil Jadhav
दक्षिण भारतातले चेन्नई शहर इडलीच्या लोकप्रियतेसाठी प्रसिद्ध आहे. तिथल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीमुळे शहराला ‘इडली कॅपिटल ऑफ द वर्ल्ड’ म्हटलं जातं.
मल्लिपू इडली मऊ, हलकी आणि फुलासारख्या पोतासाठी ओळखली जाते.
गरमागरम इडलीसोबत नारळाची चटणी आणि सांबार खाणे चेन्नईकरांच्या खाद्यसंस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे.
चेन्नईतल्या मुर्गन इडली शॉप मऊ इडली, चविष्ट चटण्या आणि सांबारसाठी प्रसिद्ध आहे.
चेन्नईतला रत्ना कॅफे पारंपरिक दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांसाठी ओळखले जाते.
संगीता रेस्टॉरंटमध्ये इडलीसह विविध दक्षिण भारतीय पदार्थ मिळतात.
चेन्नईमध्ये इडली सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या खाण्यापर्यंत आवडीने खाल्ली जाते.
किफायतशीर किंमत, सहज उपलब्धता आणि चव यामुळे इडली चेन्नईकरांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली आहे.