Sakshi Sunil Jadhav
सजीव म्हंटलं की त्याला १ हृदय असतं असं सगळ्यांनाच वाटतं. पण असा एक सजीव जीव आहे. ज्याला ५ हृदय आहेत.
पुढील माहितीत आपण कोणत्या प्राण्याला ५ हृदय असतात आणि ते कसे याबद्दल जाणून घेणार आहोत.
गांडूळ (Earthworm) हा असा प्राणी आहे ज्याला ५ हृदय असल्याचं सांगितलं जातं. ही माहिती बऱ्याचदा सामान्य ज्ञान, शालेय अभ्यासक्रम आणि स्पर्धा परीक्षांमध्ये विचारली जाते. मात्र यामागचं वैज्ञानिक कारण जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
गांडूळाला ५ स्वतंत्र हृदय नसतात, मात्र त्याच्या शरीरात हृदयासारखं कार्य करणाऱ्या रचनांचा समावेश असतो.
गांडूळाच्या शरीरात ५ जोड्या एऑर्टिक आर्चेस (Aortic Arches) असतात. या एऑर्टिक आर्चेस रक्त पंप करण्याचं काम करतात, त्यामुळे त्यांना हृदयासारखं मानलं जातं.
गांडूळाचे हे हृदयसदृश अवयव ७व्या ते ११व्या शरीरखंडामध्ये असतात. त्यामुळेच सोप्या भाषेत गांडूळाला ५ हृदय असतात असं सांगितलं जातं.
गांडूळाचा रक्ताभिसरण प्रकार बंद असतो. गांडूळाच्या रक्तात हिमोग्लोबिन असतं, पण ते लाल पेशींमध्ये नसून थेट प्लाझ्मामध्ये मिसळलेलं असतं.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास, ५ जोड्या म्हणजे एकूण १० रक्तवाहिन्या हृदयाचं कार्य करतात. सामान्य ज्ञान योग्य उत्तर गांडूळ हा ५ हृदय असलेला प्राणी आहे.