Surabhi Jayashree Jagdish
तुम्ही कधी ना कधी नक्की विचार केला असेल की पृथ्वीवर सूर्य सर्वात आधी कुठे उगवतो.
बहुतांश लोकांना वाटतं की याचं बरोबर उत्तर न्यूझीलंड किंवा जपान आहे.
खरं तर जपानला "उगवत्या सूर्याचा देश" असं म्हटलं जातं. पण आज आपण तुम्हाला याचं खरं उत्तर सांगणार आहोत.
सूर्य सर्वात आधी किरीबाती देशातील कॅरोलिन बेटावर उगवतो.
देशांतर रेषांद्वारे वेळेचं निर्धारण केलं जातं आणि त्यामुळे या देशाने स्वतःचा वेगवेगळा टाइम झोन ठरवलाय.
या बेटाला "मिलेनियम आयलंड" या नावाने देखील ओळखले जाते.
कॅरोलिन बेट हे प्रशांत महासागरात वसलेले आहे.