भेंडीच्या भाजीमध्ये मीठ कधी घालावं? योग्य वेळी न टाकल्यास चव बिघडेल

Surabhi Jayashree Jagdish

भेंडीची चवदार भाजी

भेंडी ही भाजी खायला स्वादिष्ट आणि लवकर पचणारी मानली जाते.

भेंडीचे आरोग्यदायी फायदे

भेंडी केवळ चवदारच नसते तर ती आरोग्यासाठीही उपयुक्त असते. यामुळे पचन सुधारते, रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहतं.

भेंडीतील पौष्टिक घटक

भेंडी पोषक तत्त्वांनी समृद्ध आहे. यात व्हिटॅमिन सी, के, फॉलिक ऍसिड, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखे महत्त्वाचे पोषक घटक आढळतात.

भेंडीची सोपी भाजी

भेंडी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने बनवतो. मात्र भेंडी करण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे कांदा, हिरवी मिरची आणि काही मसाले घालून ती परतून बनवणे.

भेंडीमध्ये मीठ कधी घालावे?

बर्‍याच जणांना शंका असते की भेंडीमध्ये मीठ कधी घालावे?

उत्तर

याचे योग्य उत्तर असे की भेंडी करताना मीठ नेहमी शेवटी घालावे. कारण आधी मीठ घातल्यास भेंडी पाणी सोडते, त्यामुळे भाजी चिकट होते आणि चवही बिघडते.

भेंडीच्या वेगवेगळ्या भाज्या

भेंडीपासून तुम्ही अनेक प्रकारच्या भाज्या करू शकता. जसे भेंडी मसाला, कुरकुरी भेंडी, भरली भेंडी इत्यादी.

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

येथे क्लिक करा