Manasvi Choudhary
भारतात कारचा इतिहास किती जुना आहे हे जाणून घेऊया.
भारतामध्ये पहिली कार १८९७ साली आली होती. ब्रिटिश व्यापारी विल्यम फोस्टर यांच्याकडे सर्वात पहिल्यांदा कार होती.
विल्यम फोस्टर हे क्रॉम्पटन ग्रीव्हस कंपनीचे प्रमुख होते त्यानी ही कार भारतात पहिल्यांदा कोलकत्यात आणली होती.
इंग्रजाच्या काळातील कार पहिली असली तरी भारतीय ज्यांनी पहिली कार चालवली ते होते जमशेदजी टाटा.
१९०१ मध्ये जमशेदजी टाटा यांनी पहिल्यांदा मुंबईच्या रस्त्यावर चालवली. सुरूवातीच्या कार या आधुनिक नव्हत्या.
पूर्वीच्या कार या मोठ्या आवाजात चालणाऱ्या होत्या. इंजिन मोठे असल्याने कार चालवणेही सहज सोपे होत नव्हते.
पूर्वी कार खरेदी करणं म्हणजेच श्रीमंत असणाऱ्यांची कामं होती.
१९८३ मध्ये मारूती 800 ने जगात क्रांती घडवून सर्वसामान्यांना परवडणारी कार आणली.
यानुसार आता साध्यापासून लक्झरीपर्यत सर्व मॉडेल्सच्या कार उपलब्ध आहेत.