Surabhi Jayashree Jagdish
आजकाल हृदयाशी संबंधित आजारांमध्ये वाढ ही चिंतेची बाब आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे शरीरात वाईट कोलेस्टेरॉल (LDL) चे वाढते प्रमाण.
तेलकट अन्नाचं जास्त सेवन, व्यायामाचा अभाव, जास्त मद्यपान, मधुमेह आणि लठ्ठपणा ही याची मुख्य कारणे आहेत.
जेव्हा वाईट कोलेस्ट्रॉल वाढतं तेव्हा हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि इतर हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो.
वाईट कोलेस्टेरॉलचा परिणाम त्वचेवर देखील दिसून येतो, ज्याकडे लोक सहसा दुर्लक्ष करतात. याची त्वचेवर काय लक्षणं दिसतात ते जाणून घेऊया.
जेव्हा कोलेस्टेरॉल वाढते तेव्हा त्वचेचा रंग थोडा गडद होऊ लागतो. तसेच, डोळ्यांभोवती लहान मुरुमे किंवा गाठी दिसू शकतात.
वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे चेहऱ्यावर लहान मुरुमं दिसू शकतात आणि नाकाभोवती लहान लाल मुरुमं देखील दिसू लागतात.
जर चेहऱ्यावर बराच काळ खाज सुटणं, जळजळ होणं आणि लालसरपणा येत असेल तर हे देखील उच्च कोलेस्ट्रॉलचं लक्षण असू शकतं.