Sakshi Sunil Jadhav
कुत्रा चावल्यावर अनेकजण घरगुती उपाय करतात किंवा जखम किरकोळ असल्यामुळे डॉक्टरांकडे जात नाहीत. पण असं करणं जीवावर बेतू शकतं.
जखम झाल्यानंतर लगेचच योग्य उपचार सुरू करणे सर्वात महत्त्वाचे आहे.
जखम 15 मिनिटाच्या आत साबण आणि पाण्याने धुवून घ्या. यामुळे विषाणूंचे प्रमाण कमी व्हायला मदत होते आणि संसर्गाचा धोका कमी होतो.
जर जमत असेल तर जंतुनाशक लावा. पोविडोन-आयोडीनसारखे अँटीसेप्टिक लावल्याने जखमेचे संरक्षण करण्यास मदत होते.
हळद, मिरची, तेल किंवा माती लावणं हे घरगुती उपाय करू नका. त्याने संसर्ग वाढू शकतो आणि उपचारात उशीर होतो.
डॉक्टर गरजेनुसार उपचार करायचं ठरवतील. जखमेची तीव्रता लक्षात घेऊन रेबीज लस (ARV), रेबीज इम्युनोग्लोब्युलिन (RIG), टिटॅनस इंजेक्शन किंवा गरज असेल तर अँटिबायोटिक्स देतात.
रेबीज लसीचा संपूर्ण डोस पूर्ण करा. यामध्ये ४ लसी दिल्याजातात. या १४ दिवसांच्या कालावधीत दिल्या जातात.
उपचार अर्धवट सोडू नका. सर्व डोस वेळेवर पूर्ण केल्यावरच रेबीजपासून संरक्षण मिळतं.
ही माहिती जनजागृतीसाठी आहे. कुत्रा किंवा इतर प्राणी चावल्यास स्वतः उपचार करण्याऐवजी तातडीने जवळच्या डॉक्टरांचा किंवा रुग्णालयाचा सल्ला घ्या.