Surabhi Jayashree Jagdish
जर जेवण वारंवार नीट पचत नसेल तर सर्वप्रथम आपल्या आहाराकडे लक्ष द्या. तळलेले, मसालेदार आणि जंक फूड कमी खा आणि हलका, साधा आहार निवडा. यामुळे पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण येत नाही.
जेवण लहान भागांमध्ये खाण्याची सवय लावा. एकाच वेळी खूप जेवण केल्यास पचन बिघडू शकते आणि जेवण जड वाटू शकते. तर वारंवार हलकं जेवण केल्यास पोटाला आराम मिळतो.
जेवणानंतर लगेच झोपण्याऐवजी १५–२० मिनिटे चालण्याचा व्यायाम करा. यामुळे जेवण लवकर पचते आणि गॅस किंवा आम्लतेची समस्या कमी होते.
पाणी पचनासाठी आवश्यक असलं तरी जेवणानंतर लगेच खूप पाणी पिणं टाळा. दिवसभर पुरेसं पाणी प्यायल्यास बद्धकोष्ठता आणि अपचनाची समस्या बऱ्याच अंशी कमी होते.
पपई, ताक, आलं आणि ओवा यासारख्या गोष्टी पचन सुधारण्यात मदत करतात. जर वारंवार जेवण नीट पचत नसेल तर या गोष्टी आहारात समाविष्ट करा.
जेवताना घाई न करता हळूहळू आणि नीट चावून खाण्याची सवय लावा. नीट चावल्याने जेवण सहज पचते आणि पोटावर अधिक ताण येत नाही. यामुळे पचनक्रिया सुरळीत होते.
दररोज व्यायाम, योग किंवा प्राणायाम करा. हे शरीरातील मेटाबॉलिझम सुधारतात आणि पोटाच्या तक्रारी टाळण्यास मदत करतात. नियमित हालचाल आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.