Sakshi Sunil Jadhav
जर तुम्ही परिसरातल्या कुत्र्यांच्या त्रासाला वैतागले असाल तर पुढील माहिती तुमच्याचसाठी आहे.
जेव्हा कुत्री तुमच्या अंगावर धावत येतील तेव्हा घाबरू नका. शांत राहा. कुत्र्यांचा आक्रमकपणा याने कमी होतो.
कधीही कुत्र्यापेक्षा वेगाने धावू नका. धावल्याने कुत्र्यांना भीती वाटेल आणि त्या भीतीने तुम्हाला ते चावू शकतात.
जिथे आहात तिथेच उभे राहा. हळूच मागे सरकणं सुरक्षित ठरु शकतं. त्याने कुत्र्यांना तुम्ही मारहाण करणार नाही, हे कळेल.
भीती वाटते म्हणून कुत्र्यांच्या थेट डोळ्यांना बघू नका. याने कुत्री जास्त आक्रमक होऊ शकतात.
काठी, छत्री किंवा पिशवी समोर धरून अंतर ठेवा. ही फक्त सुरक्षिततेसाठी आहे, हल्ल्यासाठी नाही असं कुत्र्यांना वाटेल.
जमिनीवरून दगड उचलून कुत्र्याला भीती वाटेल असा संकेत द्या. पण मारु नका.
कुत्र्यांना पाहून अचानक ब्रेक लावणे किंवा वेग वाढवणं टाळा. अपघात होण्याची शक्यता वाढते.
जर हातात काही धरले असेल तर ते वेगळ्या दिशेने फेका. कुत्र्याचे लक्ष त्या वस्तूवर जाईल आणि तुम्ही सुरक्षित राहाल.