Surabhi Jayashree Jagdish
वयानुसार रक्तदाबात बदल होऊ शकतात. मात्र रक्तदाब खूप वाढला किंवा खूप कमी झाला तर हार्ट अटॅक, स्ट्रोक, किडनीचे आजार आणि इतर गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे प्रत्येक वयोगटातील व्यक्तीने आपला रक्तदाब नियमित तपासून तो योग्य मर्यादेत ठेवण्याचा प्रयत्न करावा.
या वयोगटातील निरोगी व्यक्तींसाठी आदर्श रक्तदाब 120/80 mmHg किंवा त्यापेक्षा किंचित कमी असणं योग्य मानलं जातं. 90/60 mmHg ते 120/80 mmHg ही सामान्य आणि सुरक्षित श्रेणी समजली जाते. जर रक्तदाब सतत 130/80 mmHg किंवा त्यापेक्षा जास्त राहत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
या वयात कामाचा ताण, मधुमेह, लठ्ठपणा किंवा जीवनशैलीमुळे रक्तदाब वाढण्याचा धोका अधिक असतो. या वयोगटातही 120/80 mmHg हा आदर्श रक्तदाब मानला जातो आणि 130/80 mmHg पेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा.
या वयोगटात उपचार सुरू असलेल्या किंवा निरोगी व्यक्तींमध्ये रक्तदाब शक्यतो 130/80 mmHg च्या आसपास ठेवणं फायदेशीर असतं. तर काही प्रकरणांमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, 130 ते 139 mmHg पर्यंतचा सिस्टोलिक रक्तदाब असला पाहिजे. त्यामुळे या वयात स्वतः औषधांमध्ये बदल न करता डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार रक्तदाब नियंत्रित ठेवणं आवश्यक आहे.
या वयोगटात रक्तदाबाचं लक्ष्य प्रत्येक व्यक्तीच्या एकूण आरोग्य, इतर आजार आणि शारीरिक क्षमतेनुसार ठरवलं जातं. सर्वसाधारणपणे रक्तदाब 130/80 mmHg च्या आसपास ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये रक्तदाब अचानक कमी होणार नाही याचीही काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं असतं.
जर रक्तदाब 140/90 mmHg किंवा त्यापेक्षा जास्त सतत राहत असेल तर तो उच्च रक्तदाब मानला जातो आणि वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक असतं. 180/120 mmHg किंवा त्यापेक्षा जास्त रक्तदाब असल्यास तातडीने उपचारांची गरज असते.
रोज किमान ३० मिनिटं चालणं किंवा व्यायाम करणं, मीठाचं प्रमाण मर्यादित ठेवणं आणि संतुलित आहार घेणं रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं. धूम्रपान, तंबाखू, मद्यपान आणि जास्त ताण यापासून दूर राहिल्यास हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.