सतत तोंड येणं कोणत्या गंभीर समस्येचं लक्षण आहे?

Surabhi Jayashree Jagdish

उष्णता

शरीरात उष्णता वाढली की अनेकांना तोंड येतं

तोंड येणं

तोंड येण्याची समस्या केवळ खाण्यापिण्याच्या चुकीमुळे किंवा किरकोळ जखमेनेच होत नाही, तर ती अनेक आजारांचं लक्षणही असू शकते.

अॅनिमिया

शरीरात लोह, व्हिटॅमिन B12 किंवा फॉलिक अॅसिडची कमतरता असल्यास तोंडातील त्वचा संवेदनशील होते आणि तोंड येऊ शकतं.

गॅस्ट्रिक समस्या

पोटातील आम्लाचे संतुलन बिघडल्याने तोंडात उष्णता वाढते आणि तोंड येतं. पोटात जळजळ, ढेकर, मळमळ आणि वारंवार होणारे फोड ही याची लक्षणे आहेत.

डायबिटीज

मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होत जाते. त्यामुळे तोंडाच्या आतील भागावर वारंवार तोंड येऊ शकतं.

सिस्टेमिक ल्यूपस एरिथेमॅटोसायटस

ही एक ऑटोइम्यून आजाराची अवस्था आहे, ज्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती शरीरातील निरोगी पेशींवरच हल्ला करते. यामुळे तोंड येणं किंवा त्वचेवर पुरळ या समस्या सतावतात.

डॉक्टरांकडे कधी जावं

जर तोंड येण्याची समस्या वारंवार होत असेल किंवा त्यातून रक्त येत असेल, तर हे एखाद्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं.

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

येथे क्लिक करा