Dhanshri Shintre
मुलाच्या जन्मानंतर त्याच्या पचन आणि संक्रमणापासून संरक्षणासाठी आयुर्वेदात विविध उपायांचा विचार पूर्वीपासूनच केला गेलेला आहे.
सुमारे 15-20 औषधी वनस्पती मिसळून तयार केलेली बाळगुटी पचन, बुद्धी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते.
लहान मुलांसाठी दोन-तीन तासांच्या अंतराने थोडं थोडं खायला देणं आणि ठराविक जेवणाचे वेळ पाळणं आवश्यक आहे.
दोन जेवणांमधील अंतर किमान दोन ते तीन तास असावं, जेणेकरून अन्न पचनाला वेळ मिळतो.
मुलांना पॅकेज्ड खाद्यपदार्थ, जंक फूड किंवा साखरयुक्त पेयांपासून दूर ठेवावं, आरोग्यासाठी नैसर्गिक आणि ताजं अन्नच योग्य.
जेवल्यानंतर ताक पिण्याची सवय लावावी; जिरेपूड, हिंग, काळे मीठ घालून दिल्यास पचन सुधारतं आणि भूक वाढते.
मुलांसाठी भाज्या हलक्या बनवाव्यात; तेलकट टाळा आणि हिंग, आमसूल, कढीपत्ता, मिरी, आले यांचा योग्य प्रमाणात वापर करावा.
मुलांच्या आहारात कोथिंबीर, पुदिना, आले, खोबरे यांची चटणी आणि घरगुती लोणचे थोड्या प्रमाणात देणे योग्य ठरते.
मुलांना भूक नसताना चमचमीत पदार्थाऐवजी मूगाची पातळी, खिचडी, मऊ भात किंवा पौष्टिक जेवण द्यावे.