Manasvi Choudhary
घरातील मोठी मंडळी केसांना तेल लावण्याचा सल्ला देत असतात. अनेकांचा असा समज आहे की रोज केसांना तेल लावल्याने केसांची वाढ होते, केस दाट होतात.
मात्र खरंच केसांना रोज तेल लावल्याने वाढतात का? हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
केसांना तेल लावल्याने केसांच्या मुळांची वाढ होत नाही तर तुमच्या आहारावर देखील महत्वाचा आहे. आहारातील पौष्टिक घटकांचा हार्मोन्सवर परिणाम होतो.
रोज केसांना तेल लावल्याने हवेतील प्रदूषण, माती आणि धूळ टाळूवर आणि केसांना चिकटते.
दररोज केसांना तेल लावण्याऐवजी आठवड्यातून २ वेळा तेल कोमट करून केसांची मालिश करा यामुळे केसांना फायदा होईल.
केसांना तेल लावल्यानंतर हलक्या हाताने केसांचा मसाज करा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.