Surabhi Jayashree Jagdish
नथ म्हणजे स्त्रियांच्या नाकात घालण्याचा एक पारंपरिक दागिना आहे.
नथ घालण्यामागे काही वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक कारणे सांगितली जातात. ही कारणे प्रामुख्याने स्त्रियांच्या आरोग्याशी संबंधित आहेत
नथ सहसा डाव्या नाकपुडीत घातली जाते. आयुर्वेदानुसार, नाकाच्या डाव्या बाजूची मज्जातंतू स्त्रियांच्या प्रजनन प्रणालीशी आणि गर्भाशयाशी संबंधित असते.
नाक टोचल्याने आणि नथ घातल्याने या विशिष्ट मज्जातंतू उत्तेजित होतात. ज्यामुळे मासिक पाळीच्या वेदना कमी होण्यास मदत होते असं मानण्यात येतं.
काहींच्या म्हणण्यानुसार, नाक टोचल्याने श्वसनसंस्थेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते
नाक टोचल्याने सर्दी, खोकला यांसारख्या सामान्य संसर्गापासून संरक्षण मिळते असे मानले जाते.
नथ हे एक सौंदर्य वाढवणारं आभूषण आहे. ते महिलांचे सौंदर्य वाढवतं आणि त्यांना आत्मविश्वास देतं.