ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्या प्रत्येकाच्या घरात चांदीच्या वस्तू असतात.
घरात चांदीची वस्तू असणे खूप शुभ मानलं जातं.
वास्तुनुसार घरातील प्रत्येक वस्तू कोणत्या दिशेला असावी, याचे काही वास्तू नियम आहेत.
याबरोबर वास्तू योग्य दिशेला ठेवल्यास त्याचा चांगला लाभ देखील मिळतो.
वास्तुनुसार जर घरात चांदीची वस्तू किंवा दागिणे असतील तर घराच्या पश्चिम दिशेस ठेवा.
घरातील चांदीची वस्तू नेहमी लाल कपड्यात गुंडाळून ठेवावी. यामुळे मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते.
चांदीच्या वस्तू घरात सजावटीसाठी ठेवल्याने धन-संपत्तीत वाढ होते.
वास्तुदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी घरात चांदीचा खिळा ठेवावा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
NEXT: डार्क चॅाकलेट खाण्याचे आहेत आरोग्यदायी फायदे