Chetan Bodke
रितिका श्रोत्री सध्या सोशल मीडियावर तिच्या आगामी चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आली आहे.
रितिका मुख्य भूमिकेत असलेली ‘बॉईज ४’ चित्रपट येत्या २० ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
रितिकाला अनेकदा सोशल मीडियावर तू अभिनेते पुष्कर श्रोत्री यांची मुलगी आहेस का ? असा प्रश्न विचारला होता.
यावरून अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात ट्रोल सुद्धा झाली होती. पण रिअल लाईफमध्ये रितिका श्रोत्री आणि पुष्कर श्रोत्री यांच्यात कोणतेही नाते नाही.
अभिनेत्रीच्या वडिलांचे नाव ‘अतुल श्रोत्री’ असे आहे. रितिका श्रोत्रीने नुकताच ‘साम टीव्ही’ सोबत संवाद साधला होता.
रितिका श्रोत्री कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.
अभिनेत्रीच्या वेगवेगळ्या अंदाजातील फोटोंची चर्चा कायमच सोशल मीडियावर होते.
रितिकाच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो.
रितिका शेवटची ‘सरी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.