Surabhi Jayashree Jagdish
बाइकची सवारी ही केवळ प्रवास नसून एक वेगळीच अनुभूती असते. वाऱ्याची झुळूक आणि रस्त्यावरील सफर प्रत्येकासाठी खास आठवण बनते.
साधारणपणे प्रत्येक बाइकवर दोन लोकांसाठी बसण्याची व्यवस्था केलेली असते. पुढील सीटवर चालक बसतो आणि मागील सीट प्रवाशासाठी असते.
जो व्यक्ती बाइक चालवतो त्याला रायडर असे म्हटले जाते. रायडरकडे वाहनावर संपूर्ण नियंत्रण असते आणि तोच प्रवासाची दिशा ठरवतो.
अनेकांना बाइकवर मागे बसणाऱ्याला काय म्हणतात हे ठाऊक नसतं. हा प्रश्न ऐकताना तो साधा वाटतो, पण बऱ्याच जणांना याचे उत्तर देता येत नाही.
हा प्रश्न अगदी सामान्य असला तरी त्याचे योग्य उत्तर कमी लोकांना माहीत असते. जे लोक वाहनासंबंधी माहिती ठेवतात, त्यांनाच याचे अचूक उत्तर देता येतं.
बाइकवर मागे बसणाऱ्या व्यक्तीला पिलियन रायडर असे म्हटले जाते. हा शब्द इंग्रजी भाषेतून आला असून वाहतूक नियमांमध्येही याच संज्ञेचा वापर होतो.
पिलियन रायडर नेहमीच चालकाच्या मागील सीटवर बसतो. ही जागा विशेषतः प्रवाशासाठी बनवलेली असल्याने त्याला बसण्यासाठी पुरेशी जागा मिळते.