Dhanshri Shintre
'हाऊस अरेस्ट' या उल्लू अॅपवरील शोवर वाद पेटला असून, शोवर बंदीची मागणी वाढली आहे.
दरम्यान, 'हाऊस अरेस्ट' या शोविरोधात आंबोली पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर उल्लू अॅपवरील कलाकार एजाज खान आणि अॅपचे एमडी अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
बॉलिवूड अभिनेता एजाज खान गेली जवळपास दोन दशके टीव्ही आणि मॉडेलिंगच्या क्षेत्रात आपली मजबूत उपस्थिती टिकवून आहे.
एजाज खान यांनी आपल्या कारकिर्दीत ४० पेक्षा जास्त चित्रपट व मालिका गाजवल्या असून, ते एक आघाडीचे मॉडेल देखील आहेत.
या माहितीनुसार, एजाज खान यांनी त्यांच्या नावावर एकूण ४१ लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे.
या संपत्तीत ३४ लाखांची कार आणि १.४५ लाख रुपये किंमतीची बाईक यांचा समावेश असल्याचेही माहितीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
एजाज खानने आपल्या कारकिर्दीत डझनभर सुपरहिट मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर आपली खास छाप सोडली आहे.
एजाज खानने 'बिग बॉस ७'मध्ये दमदार कामगिरी करत आपली ताकद सिद्ध केली आणि प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळवले.