कोमल दामुद्रे
आपल्या हिंदू धर्मात, संस्कृती व पंरपरेत अनेक प्रतीके हे शुभ मानले जाते. त्यापैकी एक स्वस्तिक.
स्वस्तिक हे दैवीशक्ती, शुभ आणि मंगल भावनांचे प्रतीक मानले जाते.सु आणि अस्ति या दोघांपासून स्वस्तिकची निर्मिती झाली आहे. सु म्हणजे शुभ आणि अस्ति म्हणजे असणे, याचाच अर्थ शुभ असणे असा होतो, असे सांगितले जाते.
गणपतीच्या उजव्या हातावर स्वस्तिक चिन्ह असते. त्यात असणाऱ्या चार ठिपक्यांचा गौरी, पृथ्वी, कूर्म आणि अनंत देवतांचा वास असतो, असे मानले जाते.
वेदांमध्येही स्वस्तिक गणपतीचे साकार स्वरुप मानले गेले आहे.
ज्या ठिकाणी स्वस्तिक काढले जाते. त्या ठिकाणी शुभ, मंगल आणि कल्याण घडते. कारण तेथे गणपती विराजमान होतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.