Manasvi Choudhary
मनोरंजनसृष्टीतील कवियित्री, अभिनेत्री, निवेदिक अशी सर्वगुणसंपन्न अभिनेत्री स्पृहा जोशी आहे.
स्पृहाने केवळ अभिनयच नाही तर तिच्या मनमोहक सौंदर्याने देखील प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
मात्र तुम्हाला माहितीये का? स्पृहा या नावाचा खरा अर्थ काय आहे.
स्पृहा हे नाव संस्कृतमधील असून ज्याचा अर्थ इच्छा आणि आकांक्षा असा होतो.
स्पृहा जोशीचा जन्म १३ ऑक्टोबर १९८९मध्ये झाला आहे.
स्पृहाचं बालपण मुंबईत गेलं. दादरच्या बालमोहन विद्यामंदिर येथे तिची शाळा पूर्ण झाली तर रुईया कॉलेजमधून तिनं तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं.
स्पृहा जोशीला कविता सादर करायला आवडते सोशल मीडियावर देखील ती त्या शेअर करते.