Surabhi Jayashree Jagdish
प्रत्येक घरात स्वयंपाकघराला ‘अन्नपूर्णा स्थान’ मानलं जातं. कारण याच ठिकाणाहून संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य आणि समृद्धी जोडलेली असते. वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात वापरले जाणारे रंग घरातील ऊर्जा आणि धन-आरोग्यावर थेट परिणाम करतात.
वास्तुशास्त्रानुसार, सामान्यतः पांढरा, नारिंगी, पिवळा, हिरवा आणि गुलाबी रंग स्वयंपाकघरासाठी सर्वात शुभ मानले जातात. हे रंग सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात.
स्वयंपाकघर अग्नी तत्त्वाशी संबंधित असल्यामुळे गरम आणि फिकट रंग जसं की, नारिंगी आणि गुलाबी/पीच विशेषतः शुभ मानले जातात. हे रंग अग्नी तत्त्वाशी सुसंगत असतात.
वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात लाल किंवा सोनेरी रंगाचे टोन कुटुंबात धनवृद्धी आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात. अशा रंगांचा वापर लाभदायक ठरतो.
विशेषतः जर स्वयंपाकघर दक्षिण-पूर्व दिशेला असेल तर पांढरा आणि फिकट शेड्स अत्यंत शुभ मानले जातात. हे रंग जागेच्या उर्जेला संतुलित करतात.
पांढरा रंग पवित्रता आणि स्वच्छतेचं प्रतीक आहे. स्वयंपाकघरात हा रंग सकारात्मक ऊर्जा आणि पवित्रता टिकवून ठेवण्यास मदत करतो. जे अन्न तयार करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
वास्तुशास्त्रानुसार, काळा, निळा आणि गडद राखाडी रंग टाळावेत कारण हे जल तत्त्वाचे प्रतीक आहेत. हे रंग स्वयंपाकघरातील अग्नी ऊर्जा कमी करतात.