कोमल दामुद्रे
आजही लबाड स्त्रिया आणि पुरुषांकडे लग्नाचे भरपूर ऑप्शन्स असतात.
आजपण कंडोम आणि मासिक पाळी उच्चारताना आपण लाजतो.
त्यागाची वेळ आली की, आकर्षण आहे की प्रेम याचा साक्षात्कार होतो.
आज ही सफाईदारपणे इंग्रजी बोलणारयाला कुशल कारागीरापेक्षा जास्त हुशार समजले जाते
आजपण राष्ट्रगीत सुरु झाले की उभे राहावे की, बसावे हा काही थोर भारतीयांना प्रश्न पडतो.
आजही करीअर /लग्नासाठी मूलांचा कल न पाहता ज्योतिषी गाठला जातो.
आजसुद्धा डिपी/सोशल मीडिया/कपडे/मित्र यांवरुन मूलीचे चारित्र्य ठरवले जाते.
इथे पैसा असेल तर सगळे गुन्हे माफ असतात.
शिपाई बनण्यासाठीसुद्धा क्वालिफिकेशन मागतात पण शिक्षण मंत्री बनण्यासाठी नाही.
आजच्या जगात सौंदर्य फक्त शरीराच्या रुपात शोधले जाते
बहिण-भावंडे किती चांगली आहेत याची प्रचिती वाटणी होताना येते.